पाटील

        पाटील हा गावाचा प्रमुख असे.पाटील गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करी.जेव्हा  गावात तंटाबखेडा (वाद विवाद) होत असे तेव्हा गावात शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करीत असे.

        पाटलास त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत असे. जमा झालेल्य महसुली ची नोंद करणे हे काम कुलकर्णी करीत असे.गावात ते जी सेवा देत असत त्याबद्दल कुळाकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असे. त्यास "बलुता"असे म्हणत.शेती करण्याचे काम कुळे करत.

    प्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकार ते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुले, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारख्या वतनांची नावे आपल्या आडनावात घेतली.

        शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन  "पाटील" हे पद अस्तित्वात होते , प्राचीन काळापासुन गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भुमिका असायची त्या भुमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची. महाराष्ट्रात या पदावर सहसा कर्तृत्ववान, शुर व धाडसी व्यक्तीच असायची, गावगाडा चालवत असताना न्यायपुर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे इतिहासात नावारूपास येवून अजरामर झाले आहेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वामी विवेकानंद

गाव