Posts

Showing posts from August, 2020

बारा बलुतेदार

      कृषिप्रधान खेड्यांचा प्रमुख आधार म्हणजे शेतकरी होय. त्याच्या सर्व प्रापंचिक व व्यावसायिक गरजा गावातल्या गावातच भागवल्या जात होत्या. त्यासाठी सर्व प्रकारचा कारागीर वर्ग  खेड्यतच उपलब्ध असे.  शेतकऱ्यांची वर्षभर पडतील ती कामे त्या त्या कारागिराने करावयाची. मोबदल्यात शेतकरी त्या कारागिरांना आपल्या शेतातील पिकाचा काही वाटा उदरनिर्वाहासाठी देत असे. यासच ' बलुते ' असे म्हंटले जाई. समाजात बारा प्रकाराची बलुती होती. त्यांनाच समाजात ' बारा बलुतेदार ' या नावाने संबोधले जाई.      बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती. कुंभार कोळी गुरव चांभार मातंग तेली न्हावी परीट माळी महार लोहार सुतार            बलुतेदारांच्या अन्य याद्या करा कुंभार कोळी गवळी गुरव चांभार जोशी धोबी न्हावी मातंग लोहार सुतार सोनार क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यांत वेगवेगळी असू शकतात. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. ज्या गावात बलुतेदार नव्हते तेथे अलुते...

पाटील

        पाटील हा गावाचा प्रमुख असे.पाटील गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करी.जेव्हा  गावात तंटाबखेडा (वाद विवाद) होत असे तेव्हा गावात शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करीत असे.         पाटलास त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत असे. जमा झालेल्य महसुली ची नोंद करणे हे काम कुलकर्णी करीत असे.गावात ते जी सेवा देत असत त्याबद्दल कुळाकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असे. त्यास "बलुता"असे म्हणत.शेती करण्याचे काम कुळे करत.     प्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकार ते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुले, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच...

स्वामी विवेकानंद

  स्वामी विवेकानंदांद्वारे सुंदर मेसेज ..  १.जेव्हा भक्ती खाद्यपदार्थात प्रवेश करते, "खाद्यपदार्थ प्रसाद बनतात"  २. जेव्हा भक्ती पाण्यात प्रवेश करते, "पाणी अमृत बनते"                             ३.जेव्हा भक्ती प्रवासात प्रवेश करते, "प्रवास एक तंत्रज्ञान होते"  ४.जेव्हा भक्ती संगीत मध्ये प्रवेश करते, "संगीत किर्तन झाले"  ५.जेव्हा भक्ती एका घरात प्रवेश करते, "घर एक मंदिर बनते"  ६.जेव्हा भक्ती कृतीत प्रवेश करते, "कृती सेवा होते"  ७.जेव्हा भक्ती कामामध्ये  प्रवेश करते, * काम कर्म  बनतो, आणि;  ८.जेव्हा भक्ती माणसामध्ये प्रवेश करते, "माणूस माणूस बनतो"  हा विवेकानंद, एक खरा शिष्य , खरा गुरू आणि एक महान तत्वज्ञ आहे.

गाव

शेती आणि जनावरे यांचे अतूट नाते  आहे.  भारत हा शेतीप्रधान देश आहे त्यामुळे भारतीय कृषिव्यवसायात गाय-बैलांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे.      गाव हा शब्द गाई अथवा गो या शब्दापासून जन्माला आला आहे.म्हणजे सुरवात करायची झाली तर अश्मयुगापासून करावी लागेल.झालं अस की माणूस जंगलात भटकत होता.कालांतराने शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिर झाला.शेतीसाठी बैल हा उपयुक्त पशू.बैल आला म्हणजे गाय पण आलीच.तर माणूस एका ठिकाणी घर करून समूहाने राहू लागला आणि आजूबाजूची जागा शेतीसाठी वापरू लागला.या क्षेत्रात गाई चरायला जात.आत्ता ज्या क्षेत्रात गाई चरायला जात असत ते क्षेत्र गाईचं क्षेत्र म्हणून उल्लेखलं जावू लागलं. त्यावरूनच गाईची सिमा निर्धारित झाली. त्यालाच गावाचे क्षेत्र असे समजले जावू लागले. गाई या शब्दाच्या अपभ्रंशातून गाव हा शब्द तयार झाल्याचं सांगितल जात.