बारा बलुतेदार

      कृषिप्रधान खेड्यांचा प्रमुख आधार म्हणजे शेतकरी होय. त्याच्या सर्व प्रापंचिक व व्यावसायिक गरजा गावातल्या गावातच भागवल्या जात होत्या. त्यासाठी सर्व प्रकारचा कारागीर वर्ग  खेड्यतच उपलब्ध असे. शेतकऱ्यांची वर्षभर पडतील ती कामे त्या त्या कारागिराने करावयाची. मोबदल्यात शेतकरी त्या कारागिरांना आपल्या शेतातील पिकाचा काही वाटा उदरनिर्वाहासाठी देत असे. यासच 'बलुते' असे म्हंटले जाई. समाजात बारा प्रकाराची बलुती होती. त्यांनाच समाजात 'बारा बलुतेदार' या नावाने संबोधले जाई.

    बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती.

  1. कुंभार
  2. कोळी
  3. गुरव
  4. चांभार
  5. मातंग
  6. तेली
  7. न्हावी
  8. परीट
  9. माळी
  10. महार
  11. लोहार
  12. सुतार          

बलुतेदारांच्या अन्य याद्याकरा

  1. कुंभार
  2. कोळी
  3. गवळी
  4. गुरव
  5. चांभार
  6. जोशी
  7. धोबी
  8. न्हावी
  9. मातंग
  10. लोहार
  11. सुतार
  12. सोनार

क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यांत वेगवेगळी असू शकतात. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. ज्या गावात बलुतेदार नव्हते तेथे अलुतेदार हे बलुतेदाराचे काम करत असत. तेली हिंदू तर मुलाणा मुसलमान असतात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वामी विवेकानंद

गाव

पाटील