गाव
शेती आणि जनावरे यांचे अतूट नाते आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे त्यामुळे भारतीय कृषिव्यवसायात गाय-बैलांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
गाव हा शब्द गाई अथवा गो या शब्दापासून जन्माला आला आहे.म्हणजे सुरवात करायची झाली तर अश्मयुगापासून करावी लागेल.झालं अस की माणूस जंगलात भटकत होता.कालांतराने शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिर झाला.शेतीसाठी बैल हा उपयुक्त पशू.बैल आला म्हणजे गाय पण आलीच.तर माणूस एका ठिकाणी घर करून समूहाने राहू लागला आणि आजूबाजूची जागा शेतीसाठी वापरू लागला.या क्षेत्रात गाई चरायला जात.आत्ता ज्या क्षेत्रात गाई चरायला जात असत ते क्षेत्र गाईचं क्षेत्र म्हणून उल्लेखलं जावू लागलं. त्यावरूनच गाईची सिमा निर्धारित झाली. त्यालाच गावाचे क्षेत्र असे समजले जावू लागले.
गाई या शब्दाच्या अपभ्रंशातून गाव हा शब्द तयार झाल्याचं सांगितल जात.
छान... उपयुक्त माहिती 👍👌
ReplyDelete👌😍🙏🚩
DeleteNice
ReplyDeleteखुप सुंदर माहिती..👌
ReplyDelete#excellent
ReplyDelete👏👏👏
ReplyDeleteMast
ReplyDelete